१. आम्ही कोण
हे संकेतस्थळ Intrepidians चालवते. आम्ही AI युग — विशेष दिवाळी अंक २०२६ प्रकाशित करतो. या पानावर "आम्ही" म्हणजे Intrepidians, "तुम्ही" म्हणजे हे संकेतस्थळ वापरणारी व्यक्ती, आणि "अंक" म्हणजे हा दिवाळी अंक — डिजिटल, छापील किंवा App मधील.
२. खाते
- अंक Book केल्यावर तुमच्या ई-मेलवर वापरकर्तानाव आणि पासवर्ड पाठवला जातो.
- पासवर्ड यंत्राने तयार केलेला असतो. पहिल्या प्रवेशानंतर तो बदला.
- तुमचा पासवर्ड सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे.
- खाते दुसऱ्याला वापरायला देऊ नका — एक वर्गणी, एक वाचक.
- पासवर्ड दुसऱ्याकडे गेल्याची शंका असल्यास लगेच कळवा.
App मध्ये एक वर्गणी, एक उपकरण.
पहिल्यांदा ज्या फोनवर प्रवेश होतो, त्यालाच खाते बांधले जाते.
फोन बदलला असेल तर आम्हाला कळवा — आम्ही ते मोकळे करून देऊ.
संकेतस्थळावर ही मर्यादा नाही, तिथे एका वेळी एकच प्रवेश
चालतो.
३. अंकाचा वापर
वर्गणी घेतल्यावर तुम्हाला अंक वैयक्तिक वाचनासाठी वापरण्याचा हक्क मिळतो.
हे चालेल
- अंक वाचणे, ऐकणे, PDF स्वतःसाठी उतरवणे
- तुमच्या उपकरणावर offline ठेवणे
- एखादे वाक्य किंवा परिच्छेद स्रोत नमूद करून उद्धृत करणे
- अंकाची शिफारस करणे, दुवा वाटणे
हे चालणार नाही
- PDF किंवा लेख इतरांना वाटणे, WhatsApp/Telegram वर पाठवणे
- अंकातील मजकूर दुसरीकडे पुनर्प्रकाशित करणे
- वापरकर्तानाव व पासवर्ड वाटणे किंवा विकणे
- अंकातील मजकूर विकणे किंवा व्यावसायिक वापर करणे
- सुरक्षेच्या व्यवस्थेत ढवळाढवळ करणे
यांपैकी काही आढळल्यास खाते बंद केले जाईल आणि परतावा मिळणार नाही.
४. तुम्ही पाठवलेले साहित्य
अंकासाठी लेख, कथा, कविता, चित्रे किंवा चित्रफिती पाठवताना या गोष्टी लागू होतात.
तुमचा हक्क तुमचाच राहतो. आम्ही तुमच्या कलाकृतीची मालकी घेत नाही. आम्हाला फक्त ती या अंकात, संकेतस्थळावर आणि App मध्ये प्रकाशित करण्याचा हक्क मिळतो — नाव नेहमी देऊन.
साहित्य पाठवताना तुम्ही हे मान्य करता:
- ती कलाकृती तुमची स्वतःची आहे
- ती आधी कुठे प्रकाशित झालेली नाही
- तिच्यात दुसऱ्याचा copyright असलेला मजकूर, चित्र किंवा संगीत नाही
- तिच्यात द्वेषपूर्ण, अश्लील किंवा बदनामीकारक काही नाही
- AI साधने वापरली असल्यास ते तुम्ही नमूद केले आहे
संपादकीय मंडळाला मजकुरात भाषिक व मांडणीविषयक बदल करण्याचा अधिकार आहे. आशय बदलणारा बदल असेल तर तुमची संमती घेतली जाईल.
साहित्य निवडले जाईलच याची हमी नाही. न निवडलेले साहित्य परत केले जात नाही.
५. स्पर्धा
- सहभाग मोफत आहे. वयाची अट नाही.
- एका स्पर्धेत जास्तीत जास्त दोन प्रवेशिका.
- परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
- पुरेशा प्रवेशिका न आल्यास स्पर्धा रद्द होऊ शकते.
- संपादकीय मंडळाचे सदस्य व त्यांचे निकटवर्तीय भाग घेऊ शकत नाहीत.
- अंतिम मुदत — २५ ऑक्टोबर २०२६
६. किंमत आणि payment
- सर्व किमती भारतीय रुपयांत आहेत आणि करांसह आहेत.
- Payment Razorpay मार्फत होते. तुमचे card किंवा UPI तपशील आमच्यापर्यंत येत नाहीत.
- Advance booking च्या सवलतीच्या किमती मर्यादित काळासाठी आहेत.
- किंमत बदलण्याचा अधिकार आमच्याकडे आहे, पण आधी केलेल्या नोंदणीवर तो लागू होणार नाही.
परतावा आणि रद्दीकरणासाठी परतावा धोरण पहा. छापील अंक पाठवण्यासाठी पाठवणी धोरण पहा.
७. अंकातील मजकूर
अंकातील लेख हे लेखकांची मते आहेत. ती संपादकीय मंडळाची किंवा Intrepidians ची अधिकृत भूमिका असतीलच असे नाही.
अंकात दिलेली माहिती सामान्य वाचनासाठी आहे. ती व्यावसायिक, कायदेशीर, वैद्यकीय किंवा आर्थिक सल्ला नाही. त्यावर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी आमची नाही.
८. सेवेतील खंड
संकेतस्थळ आणि App सतत चालू ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो, पण देखभाल, तांत्रिक अडचण किंवा आमच्या नियंत्रणाबाहेरील कारणांनी सेवा काही काळ बंद राहू शकते. अशा खंडासाठी नुकसानभरपाई दिली जाणार नाही.
अंक तुमच्या उपकरणावर offline उपलब्ध असतो, त्यामुळे सेवा बंद असतानाही वाचन थांबत नाही.
९. जबाबदारीची मर्यादा
कोणत्याही परिस्थितीत आमची एकूण जबाबदारी तुम्ही भरलेल्या रकमेइतकीच राहील. अप्रत्यक्ष नुकसान, गमावलेला नफा किंवा माहितीच्या हानीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.
१०. बदल
या अटींत बदल झाल्यास या पानावरची तारीख बदलेल. मोठा बदल असल्यास नोंदणीकृत वाचकांना ई-मेलने कळवले जाईल. बदलानंतर संकेतस्थळ वापरणे म्हणजे नव्या अटी मान्य करणे.
११. लागू कायदा
या अटींवर भारतीय कायदा लागू होईल. कोणताही वाद ठाणे, महाराष्ट्र येथील न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रात येईल.
प्रश्न असल्यास
Intrepidians
C001, The Panvelkar Royal Square, Opp. Tulsi Vihar,
Next to Ghorpade Maidan, Hendre Pada,
बदलापूर (पश्चिम), ठाणे, महाराष्ट्र
ई-मेल — contact@intrepidians.com
WhatsApp — +91 93231 17704 · +91 98692 81034 · +91 91367 81034
संकेतस्थळ — www.aiyugdiwali.com
सोमवार ते शनिवार, सकाळी १० ते संध्याकाळी ७