व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचे व्यंगचित्र

व्यंगचित्रकार श्री. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त

व्यंगचित्र आणि खिडकी चित्रे स्पर्धा

AI युग — विशेष दिवाळी अंक २०२६

ए-आय युग दिवाळी अंक आणि कार्टूनिस्ट्स कॅफे क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने

अंतिम तारीख — ३० ऑक्टोबर २०२६

कार्टूनिस्ट्स कॅफे क्लब
व्यंगचित्र स्पर्धा — पोस्टर
१. व्यंगचित्र स्पर्धा
खिडकी चित्रे स्पर्धा — पोस्टर
२. खिडकी चित्रे स्पर्धा

पारितोषिके

दोन्ही विभागांसाठी स्वतंत्र — म्हणजे एकूण आठ बक्षिसे

प्रथम

₹५,०००

द्वितीय

₹४,०००

तृतीय

₹३,०००

उत्तेजनार्थ

₹१,०००

व्यंगचित्रे आणि खिडकी चित्रे — प्रत्येक विभागाला वरील चारही पारितोषिके स्वतंत्रपणे दिली जातील.

सहभाग घ्या

चित्र aidiwali2026@gmail.com वर ई-मेलने पाठवा · शंकांसाठी WhatsApp +91 93231 17704 · +91 98692 81034 · +91 91367 81034

अंतिम तारीख ३० ऑक्टोबर २०२६ · नियम आणि चित्रांचे आकार मागील पानावर

व्यंगचित्रे

AI च्या युगावर हसवणारे, विचार करायला लावणारे एक चित्र.

  • आकार१०१६ × १०१६ px
  • छापील८६ × ८६ मिमी
  • गुणोत्तरचौरस (१:१)
  • Resolution३०० dpi
  • रंगCMYK
  • फाइलJPG · PNG · TIFF

चौरस का — एका पानावर चार व्यंगचित्रे बसवली जातील. उभा किंवा आडवा आकार घेतला तर पानावर मोठी जागा वाया जाते.

खिडकी चित्रे

एका चौकटीतून दिसणारा तुकडा, आणि पूर्ण चित्र पाहिल्यावर बदलणारी कथा. दोन फाइल पाठवाव्या लागतील.

  • आकार२१२६ × ३१५४ px
  • छापील१८० × २६७ मिमी
  • bleed सह२५५१ × ३५७९ px
  • Resolution३०० dpi
  • रंगCMYK
  • फाइलदोन — मास्क + पूर्ण

आधी पूर्ण चित्र काढा. मग त्याच फाइलची प्रत करून त्यावर भिंत काढा आणि भोक ठेवा. एकाच फाइलमधून दोन काढल्याने आकार आपोआप जुळतो — आणि तो जुळणे आवश्यक आहे.

नियम आणि अटी

वाचून घ्या — प्रवेशिका नाकारली जाऊ नये म्हणून

  1. स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. वयाची किंवा व्यावसायिक अनुभवाची अट नाही.
  2. प्रत्येक स्पर्धक दोन्ही विभागांत भाग घेऊ शकतो. प्रत्येक विभागात जास्तीत जास्त तीन प्रवेशिका.
  3. चित्र स्वतः काढलेले आणि अप्रकाशित असावे. आधी कुठे छापलेले किंवा समाजमाध्यमांवर टाकलेले चालणार नाही.
  4. AI ने काढलेले चित्र चालेल — पण तसे स्पष्ट सांगावे, आणि कोणते साधन वापरले ते लिहावे. लपवलेले आढळल्यास प्रवेशिका बाद होईल.
  5. विषय AI आणि माणूस या भोवती असावा. राजकीय व्यक्ती किंवा पक्ष, धार्मिक प्रतीके, आणि कोणत्याही समाजाबद्दल अपमानास्पद मजकूर असलेली चित्रे स्वीकारली जाणार नाहीत.
  6. वर दिलेल्या आकारातच पाठवा. वेगळ्या आकाराची चित्रे छापता येत नाहीत, आणि ती परीक्षणाआधीच बाजूला ठेवली जातील.
  7. प्रवेशिकेसोबत नाव, गाव, मोबाइल, ई-मेल आणि चित्राचे एका ओळीत वर्णन पाठवा.
  8. निवडलेली चित्रे अंकात छापली जातील — छापील अंक, App आणि संकेतस्थळ. चित्रकाराचे नाव प्रत्येक ठिकाणी दिले जाईल.
  9. हक्क चित्रकाराचेच राहतील. आम्ही फक्त या अंकात आणि त्याच्या प्रसिद्धीसाठी वापरण्याची परवानगी घेत आहोत.
  10. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. निकालाबद्दल पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  11. अंतिम तारीख ३० ऑक्टोबर २०२६. त्यानंतर आलेल्या प्रवेशिका पुढच्या अंकासाठी ठेवल्या जातील.
  12. निकाल ७ नोव्हेंबर २०२६ रोजी, अंकाच्या प्रकाशनासोबत जाहीर होईल.

प्रवेशिका कुठे पाठवायची

ई-मेलने पाठवा. विषयात “व्यंगचित्र स्पर्धा” किंवा “खिडकी चित्र स्पर्धा” असे लिहा.

ई-मेल
aidiwali2026@gmail.com
शंकांसाठी WhatsApp
+91 93231 17704 · +91 98692 81034 · +91 91367 81034
संकेतस्थळ
www.aiyugdiwali.com

ए-आय युग · कार्टूनिस्ट्स कॅफे क्लब · दिवाळी २०२६